प्रश्न-उत्तर क्र. 1 - ६५ब सर्टिफिकेट म्हणजे काय..?
18 JAN 2023
65ब सर्टिफिकेट/प्रमाणपत्र हे कलम 65ब अंतर्गत पुरावा कायद्याची तरतूद आहे. तुमच्या मूळ इलेक्ट्रोनिक उपकरणावरून, त्याच्यातील डेटाची दुय्यम प्रत (secondary copy) तयार करण्यासाठी या कलमाद्वारे विशेष तरतूद करण्यात आली आहे. मग तो तुमचा मोबाइल, कॅमेरा, सीसीटीव्ही, ऑडिओ रेकॉर्डर वगैरे यापैकी काहीही असू शकते. - कोणतेही जे उपकरण/मशीन आहे, जे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ऑपरेट करते आणि ज्याच्यात डेटा तयार होतो, असे.
अधिक वाचा
प्रश्न-उत्तर क्र. 2 - ऑडीओ ट्रान्सक्रीप्शन का गरजेचे आहे ?
20 Jan 2023
भारतीय न्यायालयांमध्ये मोठ्या प्रमाणात केसेस प्रलंबित आहेत, हे आपण जाणतोच. न्यायालयीन युक्तिवाद, उलट तपासणीसाठी - व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (V.C.) सारखे तंत्रज्ञान, लॉकडाऊनसारखी परिस्थिती आली नसती कधी सुरु झाले नसते..!
भारतीय न्यायालयांमध्ये मोठ्या प्रमाणात केसेस प्रलंबित आहेत, हे आपण जाणतोच. न्यायालयीन युक्तिवाद, उलट तपासणीसाठी - व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (V.C.) सारखे तंत्रज्ञान, लॉकडाऊनसारखी परिस्थिती आली नसती कधी सुरु झाले नसते..!
प्रश्न-उत्तर क्र. 3 - आमचा ऑडीओ ट्रान्सक्रीप्शनचा विशिष्ठ फॉरमॅट कसा परिणामकारक आहे..?
20 Jan 2023
ट्रान्सक्रीप्शन. साधा अर्थ म्हणजे बोलल्या गेलेल्या शब्दांचे टाइप करणे..! परंतु कोणतेही ऑडिओ ट्रान्सक्रिप्शन समजून घेण्यासाठी, फक्त टायपिंग करून देणे पुरेसे नाही..! उदा. त्या बोललेल्या शब्दामागील संदर्भ किंवा त्याचा भाव दिलेला नसेल तर ते लिखित संभाषण प्रभावी होणार नाही व समजण्यासाठी मदत पण होणार नाही.
अधिक वाचा
रश्न-उत्तर क्र. - ६५ब सर्टिफिकेटचा योग्य फॉर्मट / नमुना तो कोणता ?
19 Jan 2023
नाही. विधिमंडळ किंवा न्यायपालिकेने असे कोणतेही अनिवार्य फॉरमॅट तयार केलेले नाहीत. 65b पुरावा कायद्यामध्ये नमूद केलेल्या तरतुदीनुसार फॉरमॅट तयार केला जाऊ शकतो. सर्टिफिकेट तयार करताना डिव्हाइसचे तपशील आणि त्याद्वारे काढलेल्या डेटाचा तपशील नमूद करावेत. सर्टिफिकेट तयार करतना, डेटाचे तपशील जसे की, - तारीख, वेळ, त्या डिव्हाइसचे अनुक्रमांक आणि जे महत्त्वाचे/आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबी नमूद करणे गरजेचे आहे. डेटा काढताना डेटाचे तपशील देण्यात यावेत आणि मूल्ये बदलली जाणार नाहीत, त्याची काळजी घ्यावी.
अधिक वाचा
प्रश्न-उत्तर क्र. 5 - मूळ उपकरण जर आपल्या ताब्यात नसेल तर काय होते ? व त्यासाठी काय केले जाऊ शकते ?
21 Jan 2023
पुरावा कायद्याचे 65ब कलम हे सांगतो की संगणकावरून त्याच्या इलेक्ट्रॉनिक अभिलेखातील माहितीची दुय्यम प्रत तयार करणे. या केलेल्या तरतुदीला खूप कमी वाव आहे व यात अधिक स्पष्टता नाही. त्ह्या कायद्यात स्पष्टपणे बरयाच गोष्टी सांगितलेल्या नाहीत, म्हणजे कधी आणि जर तर किंवा कुठल्या परिस्थितीत हा कायदा लागू होणार नाही व हेच्यात कुठलेही अपवाद देण्यात आलेले नाही. हे कलम केवळ संगणक आउटपुट बाबत सांगण्यात आलेले आहे, मोबाइल फोन डेटा काढणे, वेबसाइट डेटा वगैरे सारख्या गोष्टींबाबत काही सांगत नाही, परंतु आम्ही हे सर्व (उपकरणे) संगणक असल्याचे गृहीत धरू. आज रोजी विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे, विविध प्रकारचे डेटा तयार करतात. याचा थोडा संदर्भ ७९अ आयटी कायदा यात दिलेला आहे.
अधिक वाचा