६५ब सर्टिफिकेटचा योग्य फॉर्मट / नमुना तो कोणता ?


 

नाही. विधिमंडळ किंवा न्यायपालिकेने असे कोणतेही अनिवार्य फॉरमॅट तयार केलेले नाहीत. 65b पुरावा कायद्यामध्ये नमूद केलेल्या तरतुदीनुसार फॉरमॅट तयार केला जाऊ शकतो. सर्टिफिकेट तयार करताना डिव्हाइसचे तपशील आणि त्याद्वारे काढलेल्या डेटाचा तपशील नमूद करावेत. सर्टिफिकेट तयार करतना, डेटाचे तपशील जसे की, - तारीख, वेळ, त्या डिव्हाइसचे अनुक्रमांक आणि जे महत्त्वाचे/आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबी नमूद करणे गरजेचे आहे. डेटा काढताना डेटाचे तपशील देण्यात यावेत आणि मूल्ये बदलली जाणार नाहीत, त्याची काळजी घ्यावी.

 


Read this article in English Language

 

हे सर्टिफिकेट / प्रमाणपत्र प्राथमिकता, त्या उपकरणाचे (मूळ) मालक तयार करू शकतात किंवा (त्याने/तिने दुसऱ्यास दिल्यास) जो या संबंधित कामाचे व्यवस्थापन करते, अश्या प्रकारच्या कामाशी संबंधित म्हणजे डेटा एक्स्ट्रॅक्शन, डेटा एक्झामिनेश करून त्याचा रिपोर्ट/ सादरीकरण बनवून देणे वगैरे, (अशी व्यक्ती किंवा संघटन). 65B पुरावा कायद्याचे उप कलम 4/c/2 पहा.

 

ऑडिओ ट्रान्सक्रिप्शनसाठी सर्टिफिकेट देताना, टाईप केलेले संभाषणची अचूकता घोषित केली जावी. याव्यतिरिक्त डेटा तपशील आणि तांत्रिकतेच्या गुंतागुंतीचा उल्लेख केला पाहिजे, उदाहरणार्थ - नियमित संगणकांवर प्ले न करता येणारे व्हिडिओ किंवा ऑडिओ फॉरमॅटस. IT कायद्याच्या 79a मध्ये असे म्हटले आहे की ते {ह्या क्षेत्रातील} तज्ञाद्वारे तयार केले जावा.

 

अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, प्राथमिक पुरावा म्हणजेच प्राथमिक उपकरणात असलेला प्राथमिक डेटा, काढून त्याचा दुय्यम आवृत्ती तयार करतना त्याची ही (दुय्यम) प्रत अस्सल असल्याचे ६५ब प्रमाणपत्रातून पटवून देता आले पाहिजे. समजा दुय्यम प्रत - उदा. एखादा फोटो पुरावा - तो अयोग्य पध्दतीने मोबाईल फोनमधून बाहेर काढला व त्याची तारीख, वेळ, त्या फाईल चे नाव बदलले तर त्याला दुय्यम पुरवा म्हणता येणार नाही.

 

कशाचे सर्टिफिकेट देता येऊ शकते व कशाचे नाही..?
मुळात डेटा काय हा मानव स्वत: तयार करू शकत नाही, त्यामुळे प्रमाणपत्रात डेटा मुळात आला कुठून किंवा कसा आला, हे सांगावे लागते..! म्हणजेच एखादे इलेक्ट्रॉनिक उपकरण डेटा एखाद्या विशिष्ठ software प्रणाली द्वारे तयार करते. मग ज्यावेळेला डेटा तयार झालेल्या ठिकाणा वर म्हणजे file location फोटो, व्हिडीओ फाईलस डेट/ टाईम सहित किंवा app through, म्हणजे व्हॉट्सएप मधील चॅटस किंवा फेसबुक मेसेंजर मधील मेसेजेस किंवा सोप्प म्हणजे sms हे सर्व ओरिजिनल स्थितीत असतील व तेथून हालले नसतील {अगदी जैसे थे}, तर तो valid डेटा म्हणता येईल. व्हॉट्सएप मधील चॅटस दुसऱ्या (असंबंधीत) एप ओपन होऊ शकत नाही..! त्यामुळे फक्त उपलब्ध स्क्रीनशॉटस द्वारे व्हॉट्सएप चॅटस चे प्रमाणपत्र देता येत नाही.

मग समजा आपले whatsapp messages delete झाले तर प्राथमिक पुरावा नष्ट झाला असे म्हणता येईल, त्यामुळे whatsapp messages चे पूर्वी काढलेले स्क्रीनशॉटस ची validity योग्य म्हणता येणार नाही. मुळात स्क्रीनशॉट हा काही प्रायमरी डेटा नाही. काढलेले स्क्रीनशॉटस फोटोशॉप सारख्या software मधून हवे ते बदल करता येतात. त्यामुळे चॅटस प्रायमरी डिव्हाईसमध्ये, जसेच्या तसे कायम असायलाच हवेत..! उदा. वेळी प्रसंगी फेरतपासणीसाठी व्हॉट्सएप चॅटस मोबाईल मध्ये असणे गरजेचे आहे. सादरीकरणासाठी व्हॉट्सएप चॅटस चे स्क्रीनशॉटस ६५ब ची पूर्तता करताना सोबत जोडू शकता, ते स्टेप बाय स्टेप म्हणजे ते स्क्रीनशॉटस एकमेकांना कनेक्ट असले पाहिजे.

थोडक्यात प्राथमिक पुरावा जिवंत असेल व नष्ट झाला नसेल तरच त्याचे thorough examination करून डेटा खरा व genuine असल्याचे सर्टिफिकेट देणं योग्य होईल.

६५ब प्रमाणपत्र हे निरनिराळ्या तांत्रिक बाबींमुळे क्लिष्ट आहे, २ अधिक २ बरोबर ४, असं सोप्पं गणित नाही. इलेक्ट्रोनिक डेटाचे खरे-खोटे अनंत प्रकार आहेत. त्यात ८०% तांत्रिक व २०% कायदा या प्रकारे असा त्याचा समतोल साधला जाऊ शकतो.

 

कुठल्या इलेक्ट्रोनिक पुराव्याला प्रमाणपत्राची गरज नाही..?
आपल्या सर्वांना (कायद्याचा अभ्यास करणाऱ्यांना) माहिती आहे की, जर प्राथमिक पुरावा डायरेक्ट कोर्टात जमा केल्यास, त्याला ६५ब प्रमाणपत्राची आवश्यकता नाही..! पण हे काही प्रमाणात जोखीमेच व वेळ खाऊ काम आहे..!
जिथे गंभीर गुन्हे किंवा कुठल्याही प्रकारचे गैर कृत्य घडलेलं असेल किंवा व्याभीचारी / विवाहबाह्य संबंधांचे प्रकार व्हिडीओ/ फोटोच्या माध्यमातून समोर आलेलं असेल आणि त्यात चेहरे पट्टी सहज रीत्या ओळखता येत असेल, जसे की ते सीसीटीव्ही किंवा मोबाईल कॅमेरात द्वारे, त्याला कुठल्याही कायद्यातील प्रमाणपत्राची गरज, लोकांना न्याय देण्यासाठी गरज नाही..!

   

65B सर्टिफिकेटच्या फॉरमॅट, हा कायम वादाचा मुद्दा असल्याने, आम्ही इथं काही चुकीचं लिहिलेले असेल तर आम्हाला खेद आहे. तुमच्याकडे जर हेच्यापेक्षा वेगळी काही माहिती उपलब्ध असेल तर ती जरूर, कृपया आम्हाला मेल करा.