६५ब सर्टिफिकेट म्हणजे काय..?


 

65ब सर्टिफिकेट/प्रमाणपत्र हे कलम 65ब अंतर्गत पुरावा कायद्याची तरतूद आहे. तुमच्या मूळ इलेक्ट्रोनिक उपकरणावरून, त्याच्यातील डेटाची दुय्यम प्रत (secondary copy) तयार करण्यासाठी या कलमाद्वारे विशेष तरतूद करण्यात आली आहे. मग तो तुमचा मोबाइल, कॅमेरा, सीसीटीव्ही, ऑडिओ रेकॉर्डर वगैरे यापैकी काहीही असू शकते. - कोणतेही जे उपकरण/मशीन आहे, जे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ऑपरेट करते आणि ज्याच्यात डेटा तयार होतो, असे.

 


Read this article in English Language

 

डेटा जिथून मूळ उपकरणातून तयार झाला, म्हणजे त्या (इलेक्ट्रोनिक) उपकरणातून तयार केला होता (याला प्राथमिक {primary} उपकरण अथवा प्राथमिक पुरावा असेही म्हणतात) व तेथून तो, दुसर्‍या उपकरणावर अथवा मेमरी कार्ड /सीडी /पेन ड्राईव्ह /हार्ड डिस्कवर, कॉपी / काढला जातो किंवा कागदावर (जशाच तसे) प्रिंट केले जाते, त्याला दुय्यम पुरावा संबोधले जाते. सीडी (65ब सर्टिफिकेटसाठी) ह्यासाठी जुनी आणि सर्वात विश्वासार्ह तंत्र आहे, कारण यातील डेटा खराब (टेम्पर) किंवा डीलीट केला जाऊ शकत नाही, जे पेन ड्राईव्ह मध्ये शक्य होते.

 

त्यामुळे, फायदा असा की, तुमचे प्राथमिक डिव्हाइस कोर्टात दाखल न करता, म्हणजे उदा. – तुमचा मोबाइल फोन, जे तुमच्या केसमधील प्राथमिक पुरावा आहे, तर या तरतुदीचे आभार मानले पाहिजे कारण आजच्या काळात तुम्ही तुमच्या डिव्हाइस शिवाय जगूच शकणार नाही, एवढे मोबाईल वगैरे महत्वाचे झाले आहेत. आणि ह्या कलम/ कायद्याची पूर्तता केल्यावर, आपला (मोबाईल, सी.सी.टी.व्ही. वगैरे) पूरावा अधिकृत म्हणून दाखल केला जाईल, त्यामुळे तो प्राथमिक पुरावा म्हणून दाखल करण्याची गरज पडणार नाही.
{महत्वाचे : तरी तो (मोबाईल/प्राथमिक पुरावा असल्याने) नष्ट करू नये, कायम सुरक्षित ठेवावा. या संदर्भात अधिक वाचा.}

 

परंतु केवळ मूळ प्राथमिक डेटाची, दुसरी अस्सल प्रत असल्याने, तो दस्तऐवज हे दर्शवितो की ही प्रत, ही अचूक आहे व छेडछाड केलेली नाही. 65ब कायद्यानुसार दिवाणी दाव्यामध्ये आणि फौजदारी प्रक्रियेत किंवा कोणत्याही न्यायदानाच्या प्रक्रियेत, हा दुय्यम पुरावा अधिकृत मानला जातो. केवळ 65B प्रमाणपत्र प्रदान करणे हे तुमच्या केसमध्ये मेरीट अथवा योग्यता आहे, असे म्हणता येणार नाही. तुमचा मीडिया डेटा मेरिटमध्ये असणे आवश्यक आहे, तरच ह्या तरतुदीचा तुम्हाला फायदा होईल.

 

ऑडिओ ट्रान्सक्रिप्शन हा दुय्यम पुराव्याचा आणखी एक प्रकार आहे आणि त्याची शब्दशः अचूक आवृत्ती नसेल तर, माननीय न्यायालय त्यावर विसंबून राहणार नाही आणि मग त्या केसमध्ये त्याला दुय्यम पुरावा म्हणू शकत नाही. माझे विचार वाचण्यासाठी मी आपला आभारी आहे.

  


लेखक
सिद्धार्थ भगत

   
पुढील लेख वाचा