प्रश्न-उत्तर क्र. 5 - मूळ उपकरण जर आपल्या ताब्यात नसेल तर काय होते ? व त्यासाठी काय केले जाऊ शकते ?
मूळ उपकरण जर आपल्या ताब्यात नसेल तर काय होते ? व त्यासाठी काय केले जाऊ शकते ?
पुरावा कायद्याचे 65ब कलम हे सांगतो की संगणकावरून त्याच्या इलेक्ट्रॉनिक अभिलेखातील माहितीची दुय्यम प्रत तयार करणे. या केलेल्या तरतुदीला खूप कमी वाव आहे व यात अधिक स्पष्टता नाही. त्ह्या कायद्यात स्पष्टपणे बरयाच गोष्टी सांगितलेल्या नाहीत, म्हणजे कधी आणि जर तर किंवा कुठल्या परिस्थितीत हा कायदा लागू होणार नाही व हेच्यात कुठलेही अपवाद देण्यात आलेले नाही. हे कलम केवळ संगणक आउटपुट बाबत सांगण्यात आलेले आहे, मोबाइल फोन डेटा काढणे, वेबसाइट डेटा वगैरे सारख्या गोष्टींबाबत काही सांगत नाही, परंतु आम्ही हे सर्व (उपकरणे) संगणक असल्याचे गृहीत धरू. आज रोजी विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे, विविध प्रकारचे डेटा तयार करतात. याचा थोडा संदर्भ ७९अ आयटी कायदा यात दिलेला आहे.
जर तांत्रिकदृष्ट्या आणि कायद्याने विचार केला तर प्राथमिक पुरावा, जसा की तुमचा आता वापरत असलेला मोबाईल फोन, जो तुम्ही न्यायालयीन कामकाजामध्ये त्याला जमा करू शकत नाही, म्हणून तेथे आपण या कायद्याच्या मदतीने मोबाईल मधील डेटाची (व्हॉट्सऐप चॅट, ऑडिओ वगैरे) दुय्यम आवृत्ती तयार करून घेतो.
बर्याच प्रकरणांमध्ये असे होते की व्हिडिओ, ऑडिओ मोबाईलमध्ये तयार केले गेले होते परंतु ते नंतर मूळ फोन मेमरी लोकेशनवरून हलवले जातात आणि ते मूळ जिथे होते त्याऐवजी बहुतेक व्हॉट्सऐपवर सेव्ह करून ठेवले जातात. जिथे मूळ फाइलची रचना बदलली गेली आहे - (म्हणजे) तिची तारीख, वेळ, प्रकार वगैरे. त्यामुळे प्राथमिक पुरावा हटवले जातात, डिलीट होतात किंवा गायब होतात किंवा तो डेटा खूप जुना होत जातो आणि तो पर्यंत जेव्हा केसच्या तारखेपर्यंत जेव्हा पुरावा दाखल करावा लागतो, जेव्हा पुरावा देण्याची वेळ येते तेव्हा फोन एकतर बंद झालेला असतो किंवा विकला जातो किंवा सर्व डेटा डिलीट किंवा फॉरमॅट झालेला असतो.
अशा परिस्थितीत जर डेटा संगणकावर थेट कॉपी केला असेल किंवा PC सॉफ्टवेअरद्वारे काढला असेल, zipped किंवा .rar (कोणत्याही योग्य) ज्यामुळे डेटाचे डिटेलस बदलले नाहीत आणि नंतर तो डेटा तज्ञांच्या तपासणीनंतर कोर्ट कामकाजात अस्सल म्हणून केसमध्ये घेतला जाऊ शकतो. परंतु जर डेटा कोणाला पाठवताना त्याचे डीटेल्स बदलले, जसे तारीख आणि वेळ विचारात घेणे गरजेचे होईल, तेथे त्या डेटाच्या खरा असण्याचा मुद्दा उपस्थितीत होईल आणि अश्या वेळेला माननीय न्यायालयांद्वारे तो डेटा दुर्लक्षित केला जाऊ शकतो किंवा वगळला जाऊ शकतो.
जेव्हा तुम्ही तुमचा डेटा हा व्हॉट्सएप सारख्या app करताना, ते app त्यातील मेटा डेटा ची माहिती वगळून ती पाठवली जाते. उदा. त्या मूळ फाईलमधले त्याचे मूळ नाव/ तारीख/ वेळ/ डेटा values. म्हणजे उदा. एखादी कॉल रेकोर्ड झालेली ऑडीओ फाईल व्हॉट्सएप ने पाठवली असता त्या फाईल मध्ये काही बदल होतील, उदा. त्या फाईलचे नाव मोबाईल नंबर ने सुरु होऊन तारीख वेळ नमूद होते - नाव 9198xxx 88xxx_ 20230216-201002.mp3 - या फाईल ची माहिती अशी असू शकते 16 Feb 2023 - 08:10 PM. पण ते त्या फाईल अशी बदलू शकते - AUD-20230217-WA002.m4a
पण दुसरीकडे, डेटा हा जर सुरक्षित ठेवलेला असेल, एखाद्या कॉम्पुटरवर जिथे त्या फाइल्सचे तारीख वेळ व्यवस्थित मूळ फॉरमॅट मध्ये दाखवत असेल, तर त्या डेटाला योग्य मानले जाऊ शकते.