आमचा ऑडीओ ट्रान्सक्रीप्शनचा विशिष्ठ फॉरमॅट कसा परिणामकारक आहे..?
आमचा ऑडीओ ट्रान्सक्रीप्शनचा विशिष्ठ फॉरमॅट कसा परिणामकारक आहे..?
ट्रान्सक्रीप्शन. साधा अर्थ म्हणजे बोलल्या गेलेल्या शब्दांचे टाइप करणे..! परंतु कोणतेही ऑडिओ ट्रान्सक्रिप्शन समजून घेण्यासाठी, फक्त टायपिंग करून देणे पुरेसे नाही..! उदा. त्या बोललेल्या शब्दामागील संदर्भ किंवा त्याचा भाव दिलेला नसेल तर ते लिखित संभाषण प्रभावी होणार नाही व समजण्यासाठी मदत पण होणार नाही.
ट्रान्सक्रिप्शन सहज समजण्यासाठी त्यात काही गोष्टी नमूद करणे गरजेचे आहे.
त्यासाठी खरया उदाहरणासह मी आपल्याला समजून सांगतो :–
ऑडिओमधील पॅच नमूद करणे, जे ट्रान्सक्राईबरला समजू शकत नाही. उदा. जिथे आवाज कमी [--] आहे किंवा कोणताही शब्द [--] बोलणारा नीट उच्चारत नाही. उदा. 1) दोन वर्ष [--] गोष्ट करायचो आम्ही जॉबची..!
(ठराविक) उच्चारलेल्या शब्दामागे उल्लेख करण्यासारखे भाव नमूद करणे. उदा. रडून, हसून, चिडून, ओरडून वगैरे. 1) बरोबर ए का..? हो.. (हळू आवाजात) २) बरं..! (आश्चर्यचकीताने ने)
{शब्दांची स्पष्टता देणे} - चुकीचे बोललेले किंवा गावाकडील अथवा अशिक्षित भाषेत बोलल्यास, असे दोन्ही शब्द नमूद करणे. म्हणजे चुकीचा व योग्य - {योग्य} शब्द नक्षीदार कंसात दिले आहेत. 1) हॉउ {हो} , 2) डायवर्स {Divorse}, 3) प्रोशेस {Procedure} etc.
जेव्हा एखादा शब्द# किंवा शब्दांचा सेट# संपूर्णपणे बोलला जात नाही किंवा एखादा शब्द बोलत असताना थांबला जातो# जसे की दुसरा व्यक्ती बोलत असताना किंवा जेव्हा तो शब्द# त्या पुढील शब्द किंवा वाक्याशी, त्याचा संदर्भ किंवा अर्थ लागत नाही. असे शब्द बहुतांश गडबडीत, घाबरत किंवा घाईत बोलले जातात. 1) मैं#.. गणेश मेरा गुस्सा इतना खराब है..! 2) टाळी दोन हातांनी वाज#..! 3) मग कशाला.... जुज# जुजती....?
उद्गारात्मक ! किंवा प्रश्नार्थक ? योग्य वाक्यांवर किंवा शब्दाच्या पुढे, उद्गारवाचक किंवा प्रश्नार्थक चिन्ह लावणे. 1) तोंडावरती बोलणं योग्य..! 2) अच्छा..!
तुम्ही वर पाहिले असेल, ऑडिओ ट्रान्सक्रिप्शनचा अधिक अचूक अर्थ ओळखण्यासाठी आम्ही शब्दांमध्ये कीबोर्ड चिन्हे पद्धतशीरपणे वापरली आहेत.
अश्या फॉरमॅटची का गरज आहे, त्यासाठी वेगळ्या इंडस्ट्रीचं उदाहरण घेऊया - लेखक दिग्दर्शकाला चित्रपटाची कथा कशी सांगतात ? चित्रपट न बनवता कथा समजून घेणार्या दिग्दर्शकाचा विचार करा. चित्रपटासाठी लेखक त्यांचे लेखन दिग्दर्शकाला कसे कथन करतात हे पाहिले असेल तर तुम्हाला समजेल ! आणि कृपया लक्षात घ्या, की बर्याच वेळा कथा चांगली असताना, ती सांगण्यात कमी पडल्याने नाकारली जाते.
आम्हाला जे शक्य होईल ते, ऑडिओ ट्रान्सक्रिप्शनच्या आमच्या विशेष फॉरमॅटद्वारे, तुमचा ऑडिओ पुरावा अधिक चांगला सादर करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करतो. आणि चित्रपट दिग्दर्शकाचा व्यवसाय अतिशय अनुकूल आणि खेळीमेळीच्या वातावरणात चालतो पण न्यायालयीन कामकाज हे निष्पक्ष पद्धतीने चालते. त्याला अस्सल जसे आहे तसे, शब्दशः, वादग्रस्त संदर्भ न कापलेले संभाषण द्यावे लागतात.
आमचे प्रत्येक ट्रान्सक्रीप्शन 100% अचूकतेच्या हमीसह, विशिष्ट फॉरमॅटमध्ये येते - त्यातील शब्दांचे भाव, स्पष्टीकरण, तसेच कुठे प्रश्न चिन्ह अथवा उद्गार वाचक चिन्ह देयचे, अश्या सर्व आवश्यक बाबी कटाक्षाने पाहिल्या जातात, कुठलाही भाग गाळला जात नाही. तो ऑडिओ आम्ही ऐकताना आम्हाला कसे वाटते, तसेच त्याचे शब्दात रुपांतर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
आम्ही ट्रान्सक्रिप्शन करत असताना, ऑडिओचे सखोल विश्लेषण करून, त्यातील कोणता भाग ऑडिओचा सर्वात महत्त्वाचा आहे हे आपल्याला दाखवतो. सखोल विश्लेषणानंतर, आम्ही आमच्या विशिष्ट फॉरमॅटनुसार ट्रान्सक्रिप्शन बनवतो. आणि जो महत्वाचा भाग आहे त्याचे क्र. (उदा. क्र. 232528) ठळक करून त्याचे ऑडिओ सारांशात त्याचा उल्लेख करतो.
टीप - फक्त Sr No's (अनुक्रमणिका), अश्याप्रकारे ठळक करतो, त्यामुळे ते वाचण्यासाठी अधिक सोयीस्कर होते. ट्रान्सक्रिप्शन मजकूर हायलाइटिंग नाही.
ट्रान्सक्रिप्शन तयार झाल्यावर ऑडिओ संभाषणाचा सारांश (पहिल्या पानावर) लिहल्याने, माननीय न्यायालयांचा वेळ वाचण्यात मदत होते.
विशिष्ट कायद्याचे विशेष कुशल वकील जसे न्यायालयांमध्ये चांगले काम करतात, त्याचप्रमाणे आमचे ट्रान्सक्रिप्शनचे विशेष फॉरमॅट माननीय न्यायालयांना ऑडिओ रेकॉर्डिंग समजण्यास सोपे जाते.
आम्ही योग्यता / मेरिट नसलेले ऑडिओ ट्रान्सक्रिप्शनसाठी स्वीकारत नाही. त्यासाठी आम्ही जॉब घेण्याआधी त्याचे (विनामूल्य) ऑडिओ विश्लेषण करून देतो.